Home भंडारा भंडारा पंचायत समितीच्या पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारा पंचायत समितीच्या पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

210

आशाताई बच्छाव

1001283808.jpg

भंडारा पंचायत समितीच्या पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

संजीव भांबोरे
भंडारा : (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा परिषद अंतर्गत भंडारा पंचायत समितीच्या वतीने संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन शनिवारी दि.1 मार्च 2025 ला आयोजीत करण्यात करण्यात आले.
भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी गिरिधारी भोयर, यांच्या अध्यक्षतेखाली संगणक तंत्रज्ञ अमोल वलथरे . संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना भोयर , संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवचंद चौधरी, परीक्षक म्हणून मिशन मुलींची शाळा कु सुप्रिया शिंदे, कु. सोनोने पावा मुलींची शाळेच्या अंशू राऊत, सौ. वनिता खोकले, संजय पडोळे, शेखर बोरकर प्रामुख्याने उपस्थीत होते .
या तालुकास्तरीय पाककृती स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक ठाना केंद्रातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सावरी आणि व्दितीय क्रमांक जिल्हापरिषद प्राथमिक शाळा खरबी यांना मिळाला आणि तृतीय क्रमांक संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा या शाळांना मानाचा तुरा मिळाला. येथील पाक कृती स्पर्धेत 24 स्वयंपाकी व मदतनीस यांनी सहभाग घेतला. आपले कौशल्य वापरून विविध प्रकारच्या पाककृती तयार करून सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संचालन महेश जगनिक यांनी केले.अमोल वलथरे यांनी सर्व स्पर्धकांना शाळेत मिळणाऱ्या पोषण आहाराचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असणारे महत्व यावर मार्गदर्शन केले. सर्व विजेत्या शाळांचे कौतुक करण्यात आले आहे.