आशाताई बच्छाव
संस्कारक्षम अशा बालवयातच पालकांनी पाल्यावर लक्ष द्यावे
-: अश्विनी पांचाळ
मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, कुठलाही तणाव घेऊ नका
-: मानसी नोपानी
जालना, दि. २६ (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-शहरातील संभाजीनगर प्रभागातील समर्थ शिक्षण
प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेचे दोन दिवसीय
वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या
हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक यांच्या सुविद्य पत्नी निधी अजय कुमार
बंसल, पोलीस उपाधीक्षक यांच्या सुविद्य पत्नी मानसी आयुष नोपानी
यांच्यासह समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका शोभाताई भास्करराव
अंबेकर यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना पांचाळ म्हणाल्या की, शाळा
विद्यार्थ्यांना घडविण्याचे सातत्याने प्रयत्न करीत असते. परंतु केवळ
शाळेवरच अवलंबून न राहता संस्कारक्षम अशा या शालेय बालवयात पालकांनी
आपल्या पाल्यावर लक्ष देऊन त्यांच्यावर अत्यंत चांगले संस्कार रुजावेत
यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
आजचे युग हे स्पर्धेचे असल्याने प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याकडून
मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतात. या अपेक्षांची पूर्तता व्हावी याकरिता
अत्यंत बालवयापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेबरोबरच
पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मानवाच्या जीवनामध्ये शालेय
जीवनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शाळेमध्ये असतानाच आपल्या
व्यक्तिमत्वाला योग्य पैलू पाडून विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करीत
असतात. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.






