Home जालना शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

91

आशाताई बच्छाव

1001281692.jpg

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न
बदनापूर, दि. २६ (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-तालुक्यातील तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रम
येथील मनकामनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त नेत्र तपासणी
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथे ४८१ रूग्णांची नेत्र तपासणी
करण्यात आली. त्यातील १०४ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांना
शस्त्रक्रियेसाठी तारखा देण्यात आल्या.
बदनापूर, भोकरदन, जालना तालुक्यातील श्रध्दास्थान असलेले शिवशक्ती आश्रम
व गौशाळेचे महंत बालयोगी खडेश्वरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली
मनकामनेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे विविध सामाजिक व धामिर्क
कार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येते. वृक्षारोपण, बालविवाह,
अंधश्रध्दा निर्मूलन या बाबत खडेश्वरी बाबा समाज प्रबोधन करत असतात.
महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी भव्य
अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे निर्मल क्रीडा व
समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्यावतीने या
ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४८१
रूग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली
तर १०४ जणांना मोतीबिंदूचे निदान झाल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी
तारखा देण्यात आल्या. या शस्त्रक्रिया डॉ. पाथ्रीकर हे स्वखर्चाने करून
आणतात. त्यासाठी वाहनव्यवस्थेसह भोजन व्यवस्थाही ते उपलब्ध करून देतात.
शिवशक्ती आश्रमचे बालयोगी खडेश्वरी बाबा, देवा महाराज यांच्या उपस्थितीत
शिबिराची सुरुवात करण्यात आली होती. या प्रसंगी मोठया संख्येने भाविकांची
उपस्थिती होती.
००००००००००
फोटो ओळी…..
९ ते १०-तुपेवाडी येथील शिवशक्ती आश्रम येथील मनकामनेश्वर महादेव मंदिरात
महाशिवरात्री निमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Previous articleइकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी
Next articleसंस्कारक्षम अशा बालवयातच पालकांनी पाल्यावर लक्ष द्यावे -: अश्विनी पांचाळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.