Home जालना इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी

75

आशाताई बच्छाव

1001281670.jpg

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी
======
शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
==========
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे: अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनी येथील ३ वर्षीय इकरा अमजद मनियार मुलीच्या अपहरण प्रकरणाचा १२ जानेवारी २०२५ पासून शोध सुरू आहे.  मात्र, ४६ दिवस उलटूनही तपासाला वेग आलेला नाही. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण येत असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय तपासाची मागणी खा. डॉ. कल्याण काळे यांनी केली असून, त्यांच्यामार्फत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
खा. डॉ. काळे यांच्यावतीने अंबड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव तार्डे, अंबड शहराध्यक्ष जाकीरभाई डावरगावकर, माजी नगरसेवक शेख शकील लालमिया, हाजी अब्दुल हमीद, माजी नगरसेवक सय्यद अझहर, युवक काँग्रेस जालना विधानसभा अध्यक्ष शेख वसीम, काँग्रेसचे जिल्हा सचिव लक्ष्मणराव बोंबले आणि रसूलभाई यांनी  आज गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, अंबडमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेला ४६ दिवस उलटूनही कोणतेही ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत. अपहरणाच्या सुरुवातीच्या २४ तासांतच प्रभावी तपास होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, शहरात असुरक्षिततेचे वातावरण आहे.या प्रकरणाचा तपास तातडीने जलदगतीने करण्यात यावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Previous articleमोठी बातमी : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 70 तासानंतर अटक
Next articleशिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.