Home पुणे मोठी बातमी : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 70 तासानंतर अटक

मोठी बातमी : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 70 तासानंतर अटक

101

आशाताई बच्छाव

1001281652.jpg

मोठी बातमी : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 70 तासानंतर अटक
पुणे:ब्युरो चीफ उमेश पाटील
स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील एका गावातून अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी तब्बल 70 तासांचा शोध मोहीम राबवण्यात आली.
गावकऱ्यांच्या मदतीने ऊसाच्या शेतातून सापळा रचून अटक
दत्तात्रय गाडे हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथके तैनात केली होती. आरोपीस पकडण्यासाठी 100 हून अधिक पोलिसांचे 13 पथकं गावकऱ्यांच्या मदतीने ऊसाच्या शेतात उतरली होती. तसेच ड्रोन आणि स्निफर डॉगचा वापर करून त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय, आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.स्वारगेट बसस्थानक परिसरात घडली घटना
26 वर्षीय पीडित तरूणी पुण्यात नोकरीला असून, ती फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात पोहोचली होती. बस शोधत असताना आरोपी दत्तात्रय गाडेने तिची दिशाभूल करून अंधाऱ्या जागी उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
शिवशाही बस बलात्कार प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी वेगवान कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
या घटनेतील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 36 वर्षे) याची गुन्हेगारी पार्श्वभुमी असून तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. आरोपी दत्तात्रेय गाडे याच्यावर याआधीच चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंगसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१९ साली तो एका दरोड्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला होता.

Previous articleसौ.सायली ताई देशमुख यांच्या मुक्रमाबाद येथील शिव कथेला भाविकांची अलोट गर्दी
Next articleइकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.