Home उतर महाराष्ट्र शेंडीतील कसबे वस्तीवर दरोडा तीन गंभीर जखमी

शेंडीतील कसबे वस्तीवर दरोडा तीन गंभीर जखमी

111

आशाताई बच्छाव

1001268657.jpg

शेंडीतील कसबे वस्तीवर दरोडा तीन गंभीर जखमी

शेंडी, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी (ता. अहिल्यानगर) येथील टेंभी डोंगर परिसरात सोमवारी पहाटे (ता. २४) सशस्त्र दरोडा टाकत हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या दरोड्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लहानू विठोबा कसबे (वय ५८), जनाबाई लहानू कसबे, अशोक लहानू कसबे (सर्व रा. कसबेवस्ती, शेंडी, ता. अहिल्यानगर) असे जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, बीट अंमलदार शेख, सुशांत दिवटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous articleचाळीसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान
Next articleस्वप्निल बापू देशमुख यांची दैनिक नवराष्ट्र संग्रामपूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.