आशाताई बच्छाव
चाळीसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- 22/02/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) चाळीसगाव तालुका व शहर तर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सिग्नल चौक येथे सभासद नोंदणी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी असंख्य महिला, पुरुष व युवक, युवतींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष संजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, प्रदेश युवक सरचिटणीस कुशल देशमुख, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष किशोरभाऊ जाधव, तालुका सरचिटणीस मंगेश सावळे, राजेंद्र राठोड, दीपक शिंदे, नितीन भामरे, दीपक चौधरी, कुशल मोरे, रउफखान बाबे खान, अबरार खान मुख्तार खान, महिला तालुका अध्यक्ष सोनाली ताई देऊळकर, निशांत चौधरी, बंटी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






