Home जालना माहोरा येथील रेणुका माता मंदिरास योगेश लोळगे यांच्याकडून बोरवेलची देणगी

माहोरा येथील रेणुका माता मंदिरास योगेश लोळगे यांच्याकडून बोरवेलची देणगी

133

आशाताई बच्छाव

1001264631.jpg

माहोरा येथील रेणुका माता मंदिरास योगेश लोळगे यांच्याकडून बोरवेलची देणगी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 23/02/2025

सविस्तर वृत्त असे की चिखली येथील प्रसिद्ध व्यापारी व समाजसेवी योगेश लोळगे यांनी माहोरा येथील रेणुका माता मंदिरास बोरवेलची देणगी दिली आहे. या बोरवेलमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. योगेश लोळगे हे समाजहिताच्या कामांसाठी ओळखले जातात आणि त्यांनी आपल्या या देणगीद्वारे पुन्हा एकदा समाजातील जनतेच्या हिताचा विचार केला आहे.
मंदिराच्या अध्यक्ष डॉ. रवींद्र कासोद यांनी योगेश लोळगे यांचे आभार मानून ही देणगी भाविकांच्या सेवेसाठी वापरली जाईल असे सांगितले. ग्रामस्थ आणि भाविकांनीही या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे मंदिर परिसरातील पाण्याच्या समस्येचे निराकरण होऊन भाविकांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. बोरवेलची मशीन सुरू करतांना या वेळी रामधन मामा कासोद,डॉ.कासोद साहेब,सुभाषराव जाधव,समाधान मुठ्ठे,रमेश कासोद,मुरलीधर डहाके, दीपक बोरसे, भगवान लहाने, रामेश्वर शेळके,वामन लहाने,ढवळे,सांडू अण्णा कासोद आदीस गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी
Next articleमाहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे संत गाडगे बाबा महाराजयाची जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.