Home जालना माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे संत गाडगे बाबा महाराजयाची जयंती साजरी

माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे संत गाडगे बाबा महाराजयाची जयंती साजरी

97

आशाताई बच्छाव

1001264638.jpg

माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे संत गाडगे बाबा महाराजयाची जयंती साजरी
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 23/02/2025

माहोरा ग्रामसंसदेत काल दी.23 वार रविवारी संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या शिकवणुकींचा आणि समाजसुधारणा कार्याचा स्मरण केलें .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीमध्ये संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच गजानन लहाने यांनी हार अर्पण करून संत गाडगे बाबा महाराज यांच्या शिकवणुकींचा आदर करून ग्रामविकासासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ नेते भगवानराव लहाने यानी संत गाडगे बाबा महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी गावातील तरुण पिढीला प्रेरणा देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात जेष्ठ नेते भगवानराव लहाने,सरपंच गजानन लहाने,ग्रा.सदस्य प्रभाकर नाना शहागडकार,सुभाष लहाने , शिवाजी वाघ,ग्रा.स.चांदुभाऊ शिरसाठ,जुलालशिंग सोळंके,पत्रकार गव्हले,प्रकाश शिरसाट.अमोल लहाने ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण वाघ, गणेश गायकवाड व गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
संत गाडगे बाबा महाराज यांच्या शिकवणुकींचा पाठपुरावा करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या संकल्पाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleमाहोरा येथील रेणुका माता मंदिरास योगेश लोळगे यांच्याकडून बोरवेलची देणगी
Next articleजनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलाण व देवळा तालुका कार्यकारिणी जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.