Home जालना पारध आणि परिसरातील पाणंदरस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार…..आ.संतोष दानवे यांचे आश्वासन

पारध आणि परिसरातील पाणंदरस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार…..आ.संतोष दानवे यांचे आश्वासन

233

आशाताई बच्छाव

1001262030.jpg

पारध आणि परिसरातील पाणंदरस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार…..आ.संतोष दानवे यांचे आश्वासन
भोकरदन (गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी):पारध,पिंपळगाव रे.आदी गावांसह परिसरातील गावं माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे असून या गावांच्या विकासासाठी मी कायम कटिबध्द राहील असे उदगार आ.संतोष दानवे यांनी पारध बु.येथे आयोजित भव्य नागरी सत्काराला उत्तर देताना काढले.
यावेळी पुढे बोलताना आ.दानवे म्हणाले की,पावसाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील पाणंदरस्ते,पारध ते धामणगाव रस्ता,पारध ते पारध खुर्द या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून गावात काय विकास कामे पाहिजे ते मला हक्काने सांगा.
शुक्रवारी सकाळी पारध बू.येथील सर्व जाती धर्माच्या वतीने आ.संतोष दानवे यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केल्या बद्दल जाहीर नागरी सत्कार आणि संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मूर्ती प्राण देताना आ.दानवे बोलत होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती परमेश्वर लोखंडे यांनी केले तर महेंद्र लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी भाजयुमो चे पदाधिकारी देवेंद्र लोखंडे,पवन लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बिजेपी भोकरदन तालुकाध्यक्ष कौतिक जगताप, जि.प.सदस्य सुभाष देशमुख,माजी सभापती गणेश ठाले, पं.स. सदस्य गणेश लोखंडे,रामेश्वर कारखान्याचे संचालक संजय लोखंडे ,मोतीराम नरवाडे,माजी सरपंच गणेश लोखंडे,दिलीप बेराड सुखलाल बोडखे,ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.