Home जळगाव चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून वाढीव पिण्याचे पाणी आरक्षणाला जलसंपदा विभागाची मंजुरी…

चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून वाढीव पिण्याचे पाणी आरक्षणाला जलसंपदा विभागाची मंजुरी…

95

आशाताई बच्छाव

1001262081.jpg

चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून वाढीव पिण्याचे पाणी आरक्षणाला जलसंपदा विभागाची मंजुरी…

आमदार मंगेशदादा चव्हाण यांची चाळीसगाव शहर वासियांना जलमय भेट…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील– आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केंद्र व राज्य पुरस्कृत अमृत 2.0 योजनेंतर्गत थेट गिरणा धरणावरून 150 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.
सदर योजनेमार्फत शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी गिरणा धरणावरून वाढीव 4.023 द.ल.घ.मी. बिगरसिंचन पाणी आरक्षण प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले आहे.
जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने आज दि.20 फेब्रुवारी 25 रोजी शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर वासीयांची सन 2056 पर्यंतची म्हणजे पुढील 30 वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे.
हा पाणीदार निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार बिगर सिंचन मोठया प्रमाणात पाण्याच्या हक्क (Bulk Water Entitlement) मिळणेबाबत प्रस्ताव तापी पाटबंधारे विभागामार्फत जलसंपदा विभागाला देण्यात आला होता.
आता चाळीसगाव वासियांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाढीव क्षमतेची नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना मिळणार असून कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.