आशाताई बच्छाव
कंत्राट पद्धतीने नोकरी लावून देण्यासाठी पैेसै घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी कन्नडच्या संस्थाचालकावर गुन्हा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- म.रा.वि.मं. विज कंपनी मर्यादीत चाळीसगाव विभागांतर्गत सब स्टेशनवर कंत्राट पद्धतीने 8 जणांकडून प्रत्येकी 25 हजार रूपये घेऊन दोन महिन्यांचा पगार व वाढीच पगाराचा फरक तसेच दिवाळी बोनस न देता सुमारे 5 लाख 60 हजार 714 रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी
कन्नड येथील विद्युत मंडळ माजी अप्रेंटीस सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्थेचे संचालक सचिन देशमुख व सुपरवायझर प्रमोद सोनवणे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला महेंद्रसिंग शिवाजी पाटील रा. भवाळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्रसिंग पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,. वीज कंपनीत 2021 पासून कंत्राटी पद्धतीने यंत्रचालक म्हणून काम करीत असतांना कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर येथील माजी अप्रेंटीस सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्थेमार्फत विज कंपनीच्या चाळीसगाव विभागात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती होत आहे. त्यानुसार 11 महिन्याच्या करारानुसार या संस्थेमार्फत मराविम कंपनी चाळीसगाव विभागात सबस्टेशन पिंपरखेड येथे कंत्राटी पद्धतीने यंत्रचालक या पदावर नोव्हेंबर 2023 मध्ये ते रूजू झाले
डिसेंबरचा पहिला पगार झाल्यानंतर चेतन पाटील यास 15 हजार तर अरूण पाटील यास 10 हजार रूपये दिले.
ऑक्टोबर 2024 मध्ये करार संपल्यानंतर कन्नडच्या संस्थेने कामावर येवू नका असे लेखी कळविेले नाही. त्यामुळे काम सुरूच होते. जानेवारी 2025 पर्यंत नियमीत कामावर हजर असतांना या संस्थेने नोव्हेंबर 2024 मध्ये पगार 18617 रूपये देणे अपेक्षीत असतांना 15217 रूपये दिले. तसेच डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 या दोन महिन्यांचा पगार दिला नाही. तसेच दिवाळी बोनस व एप्रिल 2024 पासून झालेली पगारवाढ दिली नाही. आपल्याप्रमाणे इतर 10 जणांकडूनही करार पद्धतीने नोकरी लावण्यासाठी चेतन पाटील व अरूण पाटील यांनी प्रत्येकी 25 हजार रूपये घेतले मात्र त्यांनाही डिसेंबर जानेवारीचा पगार तसेच पगार वाढीचा फरक दिला नाही. अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने नोकरीवर लावण्यासाठी आम्हा 11 जणांकडून प्रत्येकी 25 हजार रूपये घेऊन सुमारे 5 लाख 60 हजार 714 रूपयांची फसवणुक केली म्हणून विद्युत मंडळ माजी अप्रेंटीस सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था कन्नडचे संचालक सचिन देशमुख व सुपरवायझर प्रमोद सोनवणे दोन्ही रा. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर यांच्याविरूद्ध महेंद्रसिंग शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भा.न्या.सं.2023चे कलम 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






