आशाताई बच्छाव
ईश्वरजी कातकडे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांची युवा मराठा न्यूज भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी केली चर्चा
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी( आज दिनांक 15 फरवरी 2025 ला सायंकाळी 5 वाजता भंडारा येथील अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वरजी कातकडे यांची युवा मराठा न्यूज भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन विविध विषयावर चर्चा केली. भंडारा जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन मागील सहा महिन्यापासून रुजू झाले आणि आज प्रथमच अड्याळ पोलीस स्टेशन येथे भंडारा जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची , पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, सरपंच यांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या गुन्ह्यांबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे पत्रकार संजीव भांबोरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर क्राईम ची मीटिंग घेण्याचे काय गरज भासली ? अड्याळ पोलीस स्टेशनचे आवारामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या गाड्या उभ्या असल्याने चर्चेला एकच उधान आलेला आहे त्याविषयी आपलं काय मत आहे यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात होत असलेली अवैध रेती वाहतूक व गुन्हेगारी प्रवृत्ती , सायबर क्राईम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणेप अड्याळ पोलीस स्टेशनच्या परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन व जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, अड्याळ येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील व संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार ,सहायक सब इन्स्पेक्टर व अड्याळ परिसरातील संपूर्ण पोलीस, होमगार्ड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.