आशाताई बच्छाव
// जीवेत शरद शतम //
पत्रकारितेतील चाणक्य :- संजीव मुरारी भांबोरे
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव मुरारी भांबोरे यांना मानाचा मुजरा
जेष्ठ पत्रकार , संपादक , सामाजिक कार्यकर्ते आयु. संजीव मुरारी भांबोरे सर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शांतीवन बौद्ध विहार चिचाळ / पाथरी (अड्याळ / पहेला) नगरीत मान्यवरांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी २०२५ ला संपन्न होत आहे. गत २५ वर्षाच्या कालखंडात आपल्या निर्भीड, तेवढ्याच मार्मिक दखलपात्र लिखाणाची छाप पाडणारा पत्रकार / उपसंपादक म्हणून ओळख असलेल्या या जेष्ठ पत्रकाराच्या पत्रकारितेतील व पत्रकार संघातील मोठ्या योगदानाची अपुर्वाई बघितल्यास त्यांना मी पत्रकारितेतील चाणक्य संबोधेल :- पंकज दिलीपराव वानखेडे.
आपल्या पत्रकारीतेची सुरवात दै.
लोकमत समाचार / सत्य पोलिस टाईम उपसंपादक /पुण्यनगरी/P tv news network / दैनिक दंडाधिकार/दैनिक माझा मराठवाडा / दै. शिल्पकार / जनता टाइम्स /जनता की आवाज या महाराष्ट्रातील वर्तमान पत्रातून केली. अभ्यासू वृत्ती, निर्भीडता, सामाजिक व प्रशासकीय घटनांची बारीक निरीक्षणे नोंदीची हौस. यामुळे पुढे अनेक बड्या दैनिकात
जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक,सहसंपादक, जिल्हा समन्वयक पदावरून त्यांनी पत्रकारीतेची व्यापकता व परिणामकारकता कशी असते हे दाखवून दिले. सामाजीक, राजकीय, शैक्षणिक, शासन व्यवस्थेवर केलेले इतर लिखाण “‘दखलपात्र” या सदरात मोडतात. पत्रकारितेचे आयाम बदलत आहेत, चौथ्या स्तंभावर टिकार्स चालत आहेत मात्र अजूनही माननीय संजीव मुरारी भांबोरे सरांसारखे पत्रकारितेतील चाणक्य, पत्रकारितेवरील टिकाख परतविण्यात सक्षम ठरतात. संजीव मुरारी भांबोरे सर आपले पत्रकारितेतील आयुष्य पत्रकारीतेच्या प्रगतीसाठी व आपल्या सहयोगी वार्ताहर, पत्रकार यांच्या पगल्भतेसाठी जगत आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाहीत.
आजवर ३०० वर सुशिक्षितांना पत्रकारितेच्या प्रवाहात सामील करुन घेण्याचे व त्यांना निरंतर मार्गदर्शन करण्याचे संजीव भांबोरे सरांचे काम आदर्शवत आहे. सडेतोड लिखाणासाठी कधीच तडजोड नाही, यासाठी अनेकदा वर्तमानपत्र व्यवस्थापनाचे कान टोचवून मोकळे होण्याचे संजीव भांबोरे सरांचे धाडस अनोखे. पत्रकारीता ही जबाबदारी व कर्तव्य यांची सांगड हेच त्यांच्या आजवरच्या पत्रकारीतेचे तत्व राहिले आहे. अनेक लहानमोठ्या वर्तमानपत्रात काम करीत असताना अगदी अल्प कालावधीत या वर्तमानपत्रांना त्या परिसरात, जिल्ह्यात शिखरावर नेऊन ठेवल्याचे अनेकदा त्यांनी दाखवून दिले आहे.
पत्रकारितेतील चाणक्यनिती कधी व कशी वापरायची हे सरांना त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवातून व निरंतर उंचावलेल्या पगल्भतेतून अवगत झाले आहे हे लक्षात येते. अनेक वर्तमानपत्रांमध्ये जिल्हा प्रतिनिधी / संपादक म्हणून काम करताना संपादकीय, वितरण व जाहिरात या तिन्ही विभागाचे एकत्रीत व्यवस्थापण सांभाळण्याची सर्कस आपल्या चाणक्य नीतीने संजीव मुरारी भांबोरे सरांनी अनेकदा यथोचित पार पाडल्याचे मी (पंकज वानखेडे) बघीतले आहे. मोठ्या दैनिकांमध्ये आवृत्तीचे काम सांभाळताना, सोबत निरंतर दखलपात्र लिखाण करताना संपुर्ण सजगता असावी लागते. आपली घरगुती व नैतिक जबाबदारी सांभाळून मोठ्या दैनिकांमध्ये ही जबाबदारी सांभाळण्याचे तंत्र भल्याभल्यांना जमणारे नाही. मात्र हे संजीव भांबोरे सरांनी करुन दाखविले आहे.
संघटन कौशल्य कसे असावे? हे संजीव मुरारी भांबोरे सरांकडून शिकण्यासारखे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्हात एकला चलो रे म्हणत संजीव मुरारी भांबोरे सरांची एन्ट्री झाली. भंडारा जिल्ह्याध्यक्ष पासून ते राज्य सरचिटणीस म्हणून अवघ्या वर्षभरात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शाखा उघडून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची मोठी चुणूक दाखवून दिली.
संघटनेने राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली. अवघ्या दोन वर्षात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मजबूत शाखा उघडून संघटन कौशल्य कसे असावे है दाखवून दिले. पत्रकारांच्या संघटना टिकवीणे फार कठीण काम समजले जाते. मात्र संजीव मुरारी भांबोरे सरांच्या नेतुत्वात उभ्या केलेल्या सर्व शाखा संघटीत व कार्यक्षम आहेत हे विशेष. संजीव मुरारी भांबोरे सरांची पत्रकारितेतील धमक व आगळीवेगळी ओळख हेच खऱ्या अर्थाने संघटन बांधणीचे स्रोत आहे. पत्रकारितेच्या व्यापकतेची आस्था पत्रकारीतेतील त्यांची चाणक्य नीती संघटन वाढविण्यात महत्वाची ठरली हे विशेष. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत राज्यातील सर्वात मोठ्या या पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी.टी. आंबेगावे सर तसेच राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी संजीव भांबोरे सरांची कामाची दखल घेत राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही त्यांच्या संघटनेतील कामाची पावती आहे. पत्रकारीता व पत्रकार संघटना या दोन्ही बाबी सरांच्या बौद्धिक श्रीमंतीची साक्ष देतात. दोन्ही काम तेवढ्याच ताकदीने सर सांभाळत आहेत. लिखाण व मार्गदर्शन सदोदित त्यांचेकडून घडत राहो हिच त्याच्याअभिष्टचिंतन सोहळ्यानिमीत्य अपेक्षा व पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा!
–: लेखन :-
पंकज दिलीपराव वानखेडे
मु. पोस्ट. अड्याळ
ता. पवनी जि. भंडारा
मो. 99 23 16 71 20






