Home जालना आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार...

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

137

आशाताई बच्छाव

1001233615.jpg

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन.               जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ 

शैक्षणिक जिवनात अभ्यास करीत असतांना प्रत्येकाने आपली प्रगती कशात आहे हे शोधले पाहिजे आणि राष्ट्राच्या प्रवाहात काम करीत असतांना जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या, जातीय सलोखा राखा तरच देशाची प्रगती आहे आणि ही प्रगती करण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे असे प्रतिपादन महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक अ‍ॅड. ब्रम्हनंद चव्हाण यांनी केले आहे.
जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 7 दिवसीय शिबीराचे उद्घाटन गुरुवार दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले. यावेळी ते बोलत होते. या शिबीराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे, बद्रीनाथ गोंगे, सरपंच लक्ष्मी सर्जेराव शिंदे, उप सरपंच गिरीजाबाई नामदे, सदस्य सुमित वाघमारे, सिरसाट यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अ‍ॅड. ब्रम्हनंद चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे देश घडविणारे असतात. त्यांनी जात, धर्म, पंथ या पलिकडे जावून जावून प्रत्येक समाजाला आणि समाजातल्या प्रत्येकाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे हवे-हवेसे वाटले पाहिजेत, त्या दिशेने वाटचाल करा असे आवाहन अ‍ॅड. चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी संघर्ष करुन एक समतोल शिक्षण व्यवस्था आणि दर्जेदार शिक्षण व्यवस्था उपलब्ध करुन देत त्या माध्यमातनू उत्कृष्ठ विद्यार्थी घडविल्याचेही सांगीतले.

Previous articleदैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर 27 व 28 फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Next articleकुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.