आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथे हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात केली आहे. १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पणे ठरविल्याप्रमाणे हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात करण्यात आले आहे. हत्ती रोग हा कुवेक्स( culex) नावाच्या डास चावल्यानंतर हत्तीरोग होण्यासाठी ५ ते १५ वर्ष लागतात. याच काळात आपण अल्बेन्डाझोल (Albendazde) व डी.इ.सी ( dec ) या दोन गोळ्या वर्षांतून एकदाच खाल्याने हत्तीरोग दूरीकरण नायनाट होण्यास मदत होत. तर हत्तीरोग ( Lymphatic Filariasis ) च्या नावाचे जंत मरतात व त्या व्यक्तीला हत्तीरोग होत नाही. तसेच यामध्ये २ वर्षांखालील बालके, गरोदर माता, अतीगभीर आजारी असणाऱ्या व्यक्तींना वगळून घरातील सर्व सदस्यांनी गोळ्या खाव्या व हत्तीरोगाला पळवून लावावे. मुक्रमाबाद शहरातील खाजगी डॉ संजयकुमार गुजलवार यांनी स्वतः गोळ्या खावून या हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सहभाग नोंदविला आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला १० फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत मोहीम घरोघरी जाऊन यशस्वी केली जात आहे. घरोघरी जाऊन गोळ्या हे गावातील आशासेविका देत आहेत. तरी यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ महेश खेंगटे, एस.बी.पांचाळ, एम.पी.डब्लू शेख एस.एम, सुनंदा दामेकर,सुपरवाझर उज्वला कांबळे, आशासेविका सुप्रिया (खंकरे)गोगे, पुजा बोधने,प्रतिभा गुमडे अंगणवाडी सेविकासह अनेक कर्मचारी परीश्रम घेत आहेत






