आशाताई बच्छाव
कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन मध्ये वळग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ५ क्रमांक
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लिडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था याच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव मध्ये जिल्ह्यातील १०२१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३० विद्यार्थी व १० शिक्षकांची जिल्हास्तरावर या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळग शाळेचा 5 वा क्रमांक आला यामध्ये सहभागी मार्गदर्शक श्री वटमवार आशिष सर तसेच विद्यार्थी कु. धनश्री जाधव, कु. साची लव्हकरे व अविष्कार शिंदे या 3 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सर्व विद्यार्थ्यांचा दिनांक 10-02 – 2025 रोजी माननीय प्राथमिक शिक्षण शिक्षणाधिकारी सौ. बिरगे मॅडम यांच्या हस्ते Tab नग -2 , Alexa-1 , मेडल व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना नांदेड येथे गौरविण्यात आले. तसेच दुसर्या दिवशी शाळेत सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री बावगे ओमप्रकाश सरांनी शाळेत वही , पेन , श्रीफळ, शाल व पुष्पहार देऊन सन्मानित केले या वेळी शाळेत माजी मुख्याध्यापक श्री देशमुख जयवंत सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजलवार ,श्री भंगे सर, श्री अग्रे सर , श्री मुंगळे सर, श्री राठोड सर व वटमवार सर या सर्वानी पात्र विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन केले.






