आशाताई बच्छाव
ब्रेकिंग ! ‘त्या’ कोनशीला झाकल्याने हर्षवर्धन सपकाळ भडकले ! – म्हणाले.. जिल्हा परिषद -भ्रष्टाचाराचा अड्डा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा ‘ज्या कोनशिलेवर माझ्या आजोबांच्या ठिकाणी असणाऱ्यां आदरणीय कै. त्र्यंबक भिकाजी पाटील (अंत्री-खेडेकर), कै. पुंडलिकराव गावंडे (बोथा-काजी), कै. महादेवराव आळशी (माटरगाव) या इतर काही माझ्या वाड़वडिलांची नावे अगदी ठळक पणाने नमूद होती. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ए.आर. अंतुले यांचे देखील नाव होते. या
कोनशीला भ्रष्टाचारी जिल्हा परिषदेने झाकुन ठेवल्याचे दुर्दैव असून, त्यांनीही चूक तात्काळ दुरुस्त करावी’, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष (राजीव गांधी पंचायती राज संघटन) हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक अकाउंट वरून केली आहे.
त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केली की, भूतकाळाच्या खांद्यावरच वर्तमान बसलेला असतो आणि वर्तमानाचे भान भविष्य घडवीत असतो !