Home भंडारा विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकारिता स्नेहसंमेलनाची गरज- राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे

विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकारिता स्नेहसंमेलनाची गरज- राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे

169

आशाताई बच्छाव

1001213385.jpg

विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकारिता स्नेहसंमेलनाची गरज- राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे

(उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा अड्याळ येथे प्रतिपादन )

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकरिता वर्षातून एकदा शाळेतून स्नेहसंमेलनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असल्याचे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ला उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा येथे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले. त्याचप्रमाणे आज त्याग मूर्ती रमाई यांची जयंती असून त्यांनी आपल्या परिश्रमातून बाबासाहेबांना घडविले आणि त्याच बाबासाहेबांनी संविधान लिहून विविध जाती धर्माच्या लोकांना एका सत्र छायेखाली एकत्र आणून त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांना उच्च पदावर नेण्याचे काम केलं त्या महिलांचा सन्मान करण्यात आला. परंतु ज्या सावित्रीबाईंनी येथील महिलांना घडविण्याचे काम केले सावित्रीबाईंना या देशातील सरकारने अजून पर्यंत त्यांना भारतरत्न सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले नाही ही फार शोकांतिका असल्याचे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटन अड्याळ येथील सरपंच शंकर मानापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील कोडापे हे होते .प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विकास टेंभुर्णे , माजी अध्यक्ष कल्पनाताई जांभुळकर , माजी अध्यक्ष शेवंता ताई करंजेकर ,नितीन वरंटीवार , मुख्याध्यापक राजेश श्रीरामे ,अन्वर पठाण, वसीम पठाण ,, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा गभने , ग्रामपंचायत सदस्य वसुश्री टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य तर्जुले ताई ,माला नगरे, शरद नगरे, सुनीता खोब्रागडे, देवकन्या करंजेकर , जावेद शेख ,व गावातील पालक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुला मुलींचे नृत्य गीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रामरतन मोहुरले यांनी केले. प्रास्ताविक रोशन ईरपाते केंद्रप्रमुख अड्याळ यांनी केले ,आभार हंसराज जांभुळकर यांनी मानले.

Previous articleपी.एम. सूर्य घर मुफ्त बिजली योजना अति आवश्यक :- कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रिती फुले
Next articleखळबळजनक ! अल्पवयीन मुलीला संत्र्याच्या मळ्यात नेले.. मग नको ते केले !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.