Home नांदेड नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

169

आशाताई बच्छाव

1001210464.jpg

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. ६ फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज गुरुवारी सकाळी रुजू झालेत.पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वागत झाले. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यापूर्वी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. सन 2015 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असणारे राहुल कर्डिले यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी , परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हाधिकारी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदी पदे त्यांनी भूषविली आहेत.

मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे वस्तू व सेवा कर सहआयुक्त पदावर बदली झाली आहे. अभिजीत राऊत गेल्या अडीच वर्षापासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.

Previous articleराज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२५ इच्छूकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 
Next articleसत्ता नसतांना मनपा प्रशासनकडून अनेक कामे खेचून आणनारा आप कार्यकर्ता नागेश लोणारे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.