Home जळगाव अवैध नायलॉन मांजा वापर अथवा विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करू –...

अवैध नायलॉन मांजा वापर अथवा विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करू – पोलिसांचे आवाहन

98

आशाताई बच्छाव

1001150407.jpg

अवैध नायलॉन मांजा वापर अथवा विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करू – पोलिसांचे आवाहन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दरवर्षी प्रमाणे 14/01/2025 रोजी मकर संक्रांतीचे निमित्ताने नागरीक पंतग उडविण्याचा आनंद उत्सव साजरे करीत असतात. पतंग उडविण्यासाठी नागरीक हे नॉयलॉन मांजा या धाग्याचा वापर करीत असल्याने नायलॉन मांजाच्या धागा मुळे मानवी, पशु, पक्षी यांचे जिवितास धोका निर्माण होतो
शिवाय पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन मांजामुळे अनेक मुलांना, पशु, पक्षींना गंभीर जखमा होवुन त्यात प्राण गमाविला आहे. तसेच यापुर्वी देखील अवैधरित्या मांजा विक्री करणाऱ्या विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये
व दुकानदार यांनी याची विक्री करू नये असे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर करवाई केली जाईल तसेच चाळीसगाव शहरात कोणी दुकानदार नॉयलॉन मांजाची विक्री करीत असल्यास नागरिकांनी तात्काळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केले आहे.

Previous articleचाळीसगाव पोलीस स्टेशन तर्फे पिर मुसाकादरी बाबा उर्स निमित्त शांतता समिती बैठक संपन्न
Next articleचाळीसगाव येथे मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.