Home जळगाव चाळीसगाव पोलीस स्टेशन तर्फे पिर मुसाकादरी बाबा उर्स निमित्त शांतता समिती बैठक...

चाळीसगाव पोलीस स्टेशन तर्फे पिर मुसाकादरी बाबा उर्स निमित्त शांतता समिती बैठक संपन्न

150

आशाताई बच्छाव

1001150402.jpg

चाळीसगाव पोलीस स्टेशन तर्फे पिर मुसाकादरी बाबा उर्स निमित्त शांतता समिती बैठक संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पिर मुसाकादरी बाबा उर्स चाळीसगाव येथे संपन्न होणार असून दि 15 रोजी संदल तर दि 16 रोजी सायंकाळी 5 वाजता जुनी नगरपालिका येथील भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानाहून पूज्य तलवार मातेची मिरवणूक निघणार आहे या पाश्वभूमीवर दि.13/01/2025 रोजी सायं 6 वाजता चाळीसगाव शहर पो.स्टे.येथे पीर मुसा कादरी बाबा उरूस निमित्त शांतता कमिटी मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
मंचावर आमदार मंगेशदादा चव्हाण, व्यापारी असोसिएशन चे प्रदिपदादा देशमुख, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, मुख्याधिकारी सौरभ जोशी, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, वसंतराव चंद्रात्रे, विज वितरण कंपनी चे अभियंता श्री घुमरे, श्री आडतेकर, चाळीसगाव तालुका वि का सो चेअरमन प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, गणेश रायकर, सुभाष पाटील उपस्थित होते.
यावेळी आमदार म्हणाले की हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या पिर मुसकादरी बाबा यांच्या उर्स दरम्यान प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरावाव्यात आलेल्या भाविकांना चांगले पिण्याचे पाणी द्यावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, विजवितरण कंपनीने विज पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष देवून जनरेटर ची व्यवस्था करावी, पोलीस प्रशासनाने बरकाई ने लक्ष द्यावे व बंदोबस्त ठेवावा,
चाळीसगाव मध्ये उर्स दरम्यान आजपर्यंत कुठलाही गालबोट लागला नाही आणि भानगडी होतील अशी परिस्थिती इथे उदभवली नाही आणि उदभवणारही नाही चुकून अशा काही शक्ती जर डोके वर काढत असतील तर त्यांना जागेवर ठेचल्या पाहिजे मग त्या कुठल्याही जातीच्या, धर्माच्या किंवा पक्षाच्या असो अशा चुकीच्या प्रवृत्तीना खापवले जाणार नाही
अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्या तसेच उर्स दरम्यान प्रशासन म्हणून योग्य ती खबरदारी सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी अशाही सूचना त्यांनी दिल्या.
तर उर्स मध्ये भाविक व नागरिकांनी कायदा सुव्यास्थाचे पालन करावे कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, आर डी चौधरी, सूर्यकांत कदम, नगरसेवक रामचंद्र जाधव, भालचंद्र देशमुख, गफूर पहेलवान, शाम देशमुख, बंटी ठाकूर, फकिरा मिर्झा, वसीम चेअरमन, वसीम टेलर, अस्लम मिर्झा यांनी उर्स दरम्यान सोयी सुविधा बद्दल सूचना मांडल्या तर नगरपालिका, विजवितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, दिपक देशमुख, किरण चौधरी उपस्थित होते.

Previous articleचाळीसगावच्या दानिश शेख विरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई
Next articleअवैध नायलॉन मांजा वापर अथवा विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करू – पोलिसांचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.