Home जळगाव चाळीसगावच्या दानिश शेख विरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

चाळीसगावच्या दानिश शेख विरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

112

आशाताई बच्छाव

1001150378.jpg

चाळीसगावच्या दानिश शेख विरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या दानिश शेख असलम (29) रा.नागदरोड, चाळीसगांव याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
दानिश शेख याच्या विरूध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन गैरकायद्याची मंडळी, मारहाण करून लोकांकडुन दमबाजी करुन पैसे वसुल करणे व इतर गुन्हे दाखल होते. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येवून देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नव्हता.
त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याने न्यायालयातुन जामीनावर सुटल्यावर सुध्दा पुन्हा गुन्हे केलेले होते त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षितेची भावना तयार झाली होती. दिवसें-दिवस वेगवेगळ्या तर्‍हेने गुन्हे करण्याची त्यांची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांसाठी तो उपद्रवी बनला होता.
त्याची ही कृती महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कालाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन-1981 नुसार धोकादायक व्यक्ती या संज्ञेत मोडत असल्याने त्याचे विरूद्घ पोलीस अधिक्षक जळगांव यांचे आदेशानुसार अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व हवालदार विनोद पाटील,भुपेश वंजारी यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधिक्षक यांचेकडेस पाठविला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधिक्षकांनी तो जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे पाठवला. जिल्हाधिकारी यांनी 7 जानेवारी रोजी एमपीडीए कायद्याअंतर्गत दानिश शेख असलम यांस स्थानबध्द करण्याचे आदेश काढले.
त्या अनुषंगाने आज 14 रोजी त्यास ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारगृह, नागपुर येथे पोलीस उपनिरीक्षक अरुण बाविस्कर व पोकॉ.समाधान पाटील,प्रविण लोहार,विलास पवार अश्यांनी नागपुर कारागृहाकडे रवाना झाले.या कारवाईत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,ग्रे.पो.उपनिरीक्षक कैलास पाटील, सुभाष पाटील, हवालदार विनोद पाटील,भुपेश वंजारी. पोना. दिपक पाटील यांचा सहभाग होता.

Previous article31 वा मराठवाडा नामविस्तार दिन रिपाई च्या वतीने उत्साहात साजरा
Next articleचाळीसगाव पोलीस स्टेशन तर्फे पिर मुसाकादरी बाबा उर्स निमित्त शांतता समिती बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.