Home उतर महाराष्ट्र 31 वा मराठवाडा नामविस्तार दिन रिपाई च्या वतीने उत्साहात साजरा

31 वा मराठवाडा नामविस्तार दिन रिपाई च्या वतीने उत्साहात साजरा

107

आशाताई बच्छाव

1001150361.jpg

31 वा मराठवाडा नामविस्तार दिन रिपाई च्या वतीने उत्साहात साजरा
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 31 वा मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी सुभाष त्रिभुवन म्हणाले की 14 जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार दिन पण या नामांतर दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरी जनतेला तब्बल 17 वर्ष संघर्ष करावा लागला 27 जुलै 1978 साली राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचे एकमताने ठराव संमत झाला परंतु जातीयवादी शक्तीने विरोध केल्याने आंबेडकरी अनुयांना फार मोठा संघर्ष करावा लागला त्यामध्ये अनेक भीम अनुयायींनी बाबासाहेबांच्या नावासाठी जीवाचे बलिदान दिले त्याच पद्धतीने भीम अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला मिळूनच घेतले त्या क्रांतिकारांना मानाचा जय भीम तसेच ज्यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी जीवाचे बलिदान दिलं त्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असेही शेवटी त्रिभुवन म्हणाले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते पी एस निकम तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट जिल्हा संघटक राजूनाना गायकवाड रिपाई नेते मोहन आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप जिल्हा सरचिटणीस मनोज काळे रवी अण्णा गायकवाड सोनू राठोड राजेंद्र मगर प्रदीप कदम सचिन उंबर्डे योगेश बनसोडे अंतोन शेळके आदी उपस्थित होते

Previous articleपरळीत वाल्मीक कराड समर्थक आक्रमक; अचानक काही क्षणातच परळी शहर बंद !
Next articleचाळीसगावच्या दानिश शेख विरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.