Home जालना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा

108

आशाताई बच्छाव

1001120087.jpg

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा
माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: माळीपुर्‍याचे नामांतर सावित्रीबाई फुले नगर करण्याचा ठराव लवकरात लवकर घेतला जाईल आणि राहिला प्रश्न कमानीचा तर त्यासाठी निधीची वाट पाहावी लागणार नाही. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचा पुतळाही उभा करण्यात येईल, अशी ग्वाही आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना दिली.
आज शुक्रवारी गांधी चमन परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब वानखेडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वरील मागण्या केल्या. त्या आमदार खोतकर यांनी लागलीच मान्य केल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, बाबुराव मामा जाधव, बाबु पवार, विष्णू पाचफुले, मुन्ना भोसले, राजेंद्र जाधव, विजय पवार, प्रा. राजकुमार बुलबुले, माजी सरपंच सुभाषराव पवार, गंगुबाई वानखेडे, डॉ. विशाल धानुरे, दिपक वैद्य, सुरेशराव रत्नपारखे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभीच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, राज्याने जी काही क्रांती केली तीच मुळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देण आहे. त्यांच्यामुळेच हे राज्य आणि देश आजही प्रगती पथावर आहे. सावित्रीबाईंनी अत्यंत पवित्र असं शिक्षणाचे कार्य केले. आज ज्या काही मागण्या आपल्याकडे करण्यात आल्या. त्याबाबत कोणत्याही प्रकारे निधीची अडचण येणार नाही. तुम्ही चांगला आराखडा तयार करा, आपण त्यास निश्चितच परवानगी देऊत, आणि सुशोभिकरणाचेही कामही करुत, असे आश्वासन दिले.

Previous articleजालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार –       माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे
Next articleवाकडीच्या जयंत काळेची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.