Home जालना जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार –       माजी मंत्री रावसाहेब...

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार –       माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

95

आशाताई बच्छाव

1001120070.jpg

 

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार

–       माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : – भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गति देण्याच्या उद्देशाने  रविवार 5 जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचून जास्तीतजास्त नागरिक भाजपाशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत.

 

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विकसित भारत घडविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश त्यादिशेने वाटचाल करत आहे. याच वाटचालीचा एक भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र घडवण्याचे ध्येय आपण सर्वांनी बाळगले आहे. भाजपची संघटना अधिक बळकट व्हावी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे वर्चस्व वाढावे, यासाठी सदस्य नोंदणी अभियान महत्त्वपूर्ण आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे काम या सदस्यता अभियानाद्वारे करावे लागेल. भाजपा पक्ष हा एक विशाल कुटुंब आहे. अधिक सदस्य नोंदणी केल्याने पक्षाची ताकद वाढते आणि आपण अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ही बाब लक्षात घेत अनेक सामाजिक कार्यकर्ते भाजपा परिवारात प्रवेश करत आहेत. आपण सर्वांनी ही भाजपचे सदस्यत्व स्वीकारून देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे व सर्वांनी रचनात्मक नियोजन करून प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleपुस्तकात न मावणारा विषय म्हणजे उत्तुंग व्यक्तिमत्व सावित्री आई फुले — ग्यानचंद जांभुळकर
Next articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.