आशाताई बच्छाव
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी – आदर्श विद्यामंदिर मध्ये विज्ञान मेळावा संपन्न
शनिवार दिनांक 04/01/ 2025 रोजी आदर्श विद्यामंदिर सोनई माध्यमिक विभागामध्ये विज्ञान गणित मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रसंगी श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय सौ. जयश्रीताई रविराज पाटील गडाख या अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्रीमान रविराज तुकाराम पाटील गडाख, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेसमाळसकर सर हे उपस्थित होते.विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. सन्माननीय रवीराज पा.गडाख व सौ. जयश्रीताई गडाख यांनी अमूल्य वेळ देऊन सर्व बाल वैज्ञानिकांच्या उपकरणांची बारकाईने पाहणी केली व समाधान व्यक्त केले. व बाल वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यामध्ये 5वी ते 7वी लहान गट व 8वी ते 10वी मोठा गट असे आयोजन करण्यात आली होते. यामध्ये लहान गटात 41 उपकरणांची व मोठ्या गटात 26 उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. या प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात आले व त्यांना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रस्तावित करण्यात आले. मोठ्या गटातील पर्यवेक्षणाचे काम श्री तुवर सर,श्री पवार सर व श्री वाबळे सर यांनी केले तर लहान गटातील पर्यवेक्षणाचे काम श्री फोपसे सर, श्री शिंदे सर व श्रीमती आवटे मॅडम यांनी केले.
लहान गट
प्रथम क्र. – चि.कुसळकर आनंद.
द्वितीय क्र.- चि. लोहकरे कौस्तुभ.
तृतीय क्र.- कुमारी जिज्ञासा चव्हाण
उत्तेजनार्थ – कुमारी मुंगशी श्रेया व बनसोडे पूजा
मोठा गट
प्रथम क्र. – कुमारी ज्ञानेश्वरी गडाख
द्वितीय क्र.- कुमारी रोवा भालेराव.
तृतीय क्र. – कुमारी श्रेया शिंदे.
उत्तेजनार्थ – चि.माहीम पठाण व कुमारी आसने धनश्री.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड श्री गुलदगड सर यांनी केले तर अनुमोदन श्री पवार एस. पी. सर यांनी दिले. विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री केस माळसकर सर यांनी प्रास्ताविक केले व समारोप श्री दराडे सर यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तुवर सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी सहभागी झाली