आशाताई बच्छाव
आदर्श गाव विकासासाठी रोझे ग्रामपंचायतीकडून आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेची निवड
मालेगाव:- तालुक्यातील रोझे ग्रामपंचायतीकडून आदर्श गाव विकासासाठी आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेला ग्रामसभेतून ठरावा व्दारे सामाजिक क्षेत्रातील विविध कार्य करण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड व उपसरपंच सोमनाथ सहादू उगले यांनी दिली.
आश्रयआशा फाऊंडेशन हि संस्था सामाजिक व विविध क्षेत्रात कार्यरत असून,संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्राभर असल्याने,रोझे गावाच्या विकासासाठी आदर्श गाव संकल्पना राबवून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गावाची आदर्श गावाकडे वाटचालीसाठी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने कार्य केले जाणार आहे.संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हे मालेगाव तालुक्यातील व-हाणे गावी आहे.तर संस्था भारत सरकारच्या निती आयोगाकडे नोंदणीकृत आहे.संस्थेला आय.एस.ओ.प्रमाणपत्र प्राप्त असून,संस्था महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर्ड झालेली आहे.त्यामुळे रोझे गावांसाठी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचे मोलाचे योगदान लाभणार आहे.






