आशाताई बच्छाव
भास्करगिरी महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
अलंकापुरी /अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
श्रीक्षेत्र आळंदी येथील तपोवन वेदश्री वेदशाळेच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगड (ता. नेवासे) येथील श्रीदत्त संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांचा शाल, पुष्पहार व विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन संतपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांनी विठूनामाचा व संतश्रेष्ठ माउली नामाचा जयघोष करीत टाळ्यांचा कडकडाट केला.
अयोध्यातील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज
यांच्या संकल्पनेतून वेदश्री वेदशाळेत संत कृतज्ञता संवाद मेळाव्यात राज्यातील प्रमुख संत, महंतांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भास्करगिरी महाराज, मारुती बाबा कुहेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी प्रांताचे धर्माचार्य जनार्धन महाराज मेटे व आमदार महेश लांडे उपस्थित होते.