Home जालना वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

117

आशाताई बच्छाव

1001111556.jpg

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा
स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम
बदनापूर,/ जालना दि. २ (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-बदनापूर येथे शासकीय समाज कल्याण शाळेत
तालूकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये बिट
दाभाडी, बिट बदनापूर व बिट गेवराई बाजार या तीनही बिटातील शाळांचे लहान
गट व मोठा गट अशा दोन्ही गटाच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाल्हा (केंद्र कंडारी बिट गेवराई बाजार) या
शाळेतील वर्ग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला
आहे.
यावेळी यशस्वी विद्यार्थी ज्ञानेश्वरी योगेश आगलावे, ऋतुजा बाबासाहेब
कोल्हे, युवराज रामेश्वर तायडे यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांची
निवड बदनापूर तालुक्यामधून जिल्हास्तरासाठी झाली आहे. यापूर्वी शालास्तर,
केंद्रस्तर,बितस्तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत याच शाळेतील मोठा गट प्रथम
क्रमांकावर विजयी झाला होता. यावेळी शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ,भालेराव,
गटशिक्षण अधिकारी क्षिरसागर,गट समन्वयक  झुंबड,म्हस्के,खिल्लारे, बालाजी
मदन, पाटील,जगदाळे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी परिश्रम घेणारे
मुख्याध्यापक पी. यु. आरसुड, गोंदीकर,वाघ, लिंभोरे, शिनगारे,नवसुपे,
दिपाली खैरे -तांबेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले.
००००००००००
फोटो ओळी…..
५-बदनापूर येथे शासकीय समाज कल्याण शाळेत तालूकास्तरीय प्रश्नमंजुषा
स्पर्धा घेण्यात आली. यात वाल्हा येथील वर्ग सहावी ते आठवीच्या
विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
००००००००