Home जालना रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

103

आशाताई बच्छाव

1001111532.jpg

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

 

जालना,दि.02 (जिमाका) :- जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्णा चिंतल यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने रस्ता सुरक्षाविषयक बॅनरद्वारे जनजागृती करणे, शाळा, महाविद्यालयात रस्ता सुरक्षाविषयक व्याख्यान आयोजित करणे, रस्त्यावरील बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाहनांना परावर्तिका (रिफलेक्टर) लावणे, वाहन चालकांची आरोग्य तपासणी करणे, मोटार ड्रायव्हींग स्कूल कार्यशाळा आयोजित करणे तसेच जिल्ह्यातील रस्ते अपघातास कारणीभूत बाबींची तपासणी करणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 

Previous articleबोढरे येथे कुटुंबास मारहाण-दोघांच्या विरोधात गुन्हा
Next articleवाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.