Home जळगाव बोढरे येथे कुटुंबास मारहाण-दोघांच्या विरोधात गुन्हा

बोढरे येथे कुटुंबास मारहाण-दोघांच्या विरोधात गुन्हा

109

आशाताई बच्छाव

1001111501.jpg

बोढरे येथे कुटुंबास मारहाण-दोघांच्या विरोधात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- नातूला जेवणास बोलावल्याच्या कारणातून दोघांनी महिलेस तिच्या पतीस व नाती यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून महिलेच्या गळ्यावर लोखंडी पाईपने मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील बोढरे येथे घडली.याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मल्लू लोला चव्हाण रा.बोढरे ता. चाळीसगाव यांच्या पत्नीने जेवणासाठी नातूला बोलावले.यावरून संशयित देविदास भिमराव जाधव व विकास भिमराव जाधव यांनी दारूच्या नशेत फिर्यादी व फिर्यादीची पत्नी आणि दोन नाता यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली
व विकास जाधव याने हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यावर मारून दुखापत केली व येथून तुम्हाला हाकलून देवू, तुम्हाला गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता घडली.
या प्रकरणी मल्लू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दोघांच्या विरोधात कलम 118(1),115(2),352,351(2), 355, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मनोज पाटील करीत आहेत.