Home जळगाव व्हॉटसअपवरून तरुणीकडे व्यक्त केली लैंैगिक संंबंधाची इच्छा – अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा...

व्हॉटसअपवरून तरुणीकडे व्यक्त केली लैंैगिक संंबंधाची इच्छा – अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

104

आशाताई बच्छाव

1001111483.jpg

व्हॉटसअपवरून तरुणीकडे व्यक्त केली लैंैगिक संंबंधाची इच्छा – अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- एका व्यक्तीने चक्क व्हॉटसअपवरून 21 वर्षीय महिलेकडे लैगिंक संंबंधाची इच्छा व्यक्त केल्याची खळबळजनक माहीती समोर आली असून याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, मालेगाव भागातील फिर्यादी 21 वर्षीय महिला चाळीसगाव तालुक्यातील एका गावात तिच्या आई वडिलांकडे असतांना दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास या महिलेच्या मोबाईलच्या व्हॉटसअप अकाउंटवर अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलच्या व्हॉटसअप संदेशाद्वारे फिर्यादी तरूणीशी उघड उघड लैंगिक गोष्टीची मागणी करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला
व फिर्यादी तरूणीचा फोटो तिच्या संमतीशिवाय व्हॉटसअप अकाउंटच्या डीपीवर ठेवला व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी तरुणीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेऊन पोलीसांना झाला प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून अश्‍लिल संदेश पाठवणार्‍या मोबाईलधारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 75(1),(आय),351(4), आयटी अ‍ॅक्ट कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यचा तपास पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार हे करीत आहेत.

Previous articleरांजणगाव येथे बिबटयाच्या हल्यात 3 वर्षीय बालिका ठार
Next articleबोढरे येथे कुटुंबास मारहाण-दोघांच्या विरोधात गुन्हा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.