Home जळगाव रांजणगाव येथे बिबटयाच्या हल्यात 3 वर्षीय बालिका ठार

रांजणगाव येथे बिबटयाच्या हल्यात 3 वर्षीय बालिका ठार

127

आशाताई बच्छाव

1001111467.jpg

रांजणगाव येथे बिबटयाच्या हल्यात 3 वर्षीय बालिका ठार

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरूच असून आज गुरूवारी दुपारी साडे चार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास रांजणगाव शिवारात शेतातील लिंबूच्या बागेत खेळणार्‍या 4 वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार कळताच शेतकर्‍यंानी घटनास्थळी धाव घेत बालीकेला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषीत केले.
तर घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. गेल्या चार महिन्यातील मानवी बळीची तालुक्यातील तिसरी घटना आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात पुष्कर रविंद्र चव्हाण यांचे शेत असून शेतात लिंबू बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यापासून मध्यप्रदेशातील कांज्या मांजर्‍या पावरा हा पत्नी व तीन मुलींसह येथे राहत आहे. आज गुरूवारी दुपारी साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान कांज्या पावरा हा लिंबूच्या काम करत होता तर बाजुलाच त्याची चार वर्षाची मुलगी रसला ही खेळत होती.
त्याचवेळी बिबट्याने या बालिकेवर हल्ला करून तिला ओढत नेले. हा प्रकार कळताच कांज्या पावरा याने आरडओरड केली. त्यावेळी आसपासचे शेतकरी धावत आले. मात्र मुलीवर हल्ला करणारा बिबट्या पसार झाला.
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसला हिला तात्काळ शेतकर्‍यांसह नागरीकांनी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषीत केले.