Home बीड पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पोलीस...

पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पोलीस बांधवांचा सत्कार!

198

आशाताई बच्छाव

1001111460.jpg

पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पोलीस बांधवांचा सत्कार!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि. ०२ जानेवारी २०२५ रोजी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिनाचे औचित्य साधून परळी शहर पोलीस स्टेशन मधील ठाणे अंमलदार एस. एस. शिंदे आणि होमगार्ड पटनाईक सूर्यकांत बुदे यांचा येथील अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करून पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला आणि पोलीस बांधवांना शुभेच्छा दिल्या. पोलीस प्रशासनातील उच्च अधिकारी आणि पोलीस बांधव रात्रंदिवस आपल्या जीवाची परवा न करता सामान्य जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र परिश्रम करतात. “सदरक्षणाय खलनिग्रणाय” हे घोषवाक्य पोलीस दलाचे आहे. म्हणजेच सदैव सज्जनांचे रक्षण करील व दुर्जनांचा नाश करील याप्रमाणे पोलीस दलातील सर्व पोलीस बांधव आपले कर्तव्य अतिशय निष्ठापूर्वक बजावतात. आशा या पोलीस दलाचा पोलीस स्थापना दिन साजरा करण्याचे भाग्य आहे. यावेळी पोलीस बांधवांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मित्र मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न झाला. यावेळी अनिल चौधरी, जिरेवाडीचे उपसरपंच राहुल कांदे, शिवा बडे, शिरीष सलगरे, संदीप चौधरी, रामेश्वर खके , देविदास मुंडे ,अर्जुन गिरी आदी मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleसर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम मधील कलम 4 ते 5 अमलबजावणी करा….
Next articleरांजणगाव येथे बिबटयाच्या हल्यात 3 वर्षीय बालिका ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.