Home उतर महाराष्ट्र माळीवाडा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

माळीवाडा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

182

आशाताई बच्छाव

1001110197.jpg

माळीवाडा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण.                                                         अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची अल्पवयीन मुलगी माळीवाडा बस स्थानक परिसरात असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. सदरची घटना फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी मुलीचा परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादीने कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून मुलीचा शोध सुरू केला आहे.

Previous articleसूर्यपुत्र शनीचा जयघोष
Next articleसोनई महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.