आशाताई बच्छाव
सोनई महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न… अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अंतर्गत दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी स.९:३० वा. वाचन संकल्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत लेखक कविवर्य डॉ.रेवननाथ पवार यांनी जीवनातील वेगवेगळी उदाहरणे देऊन वाचनाबरोबरच लेखन कशा पद्धतीने करावे आणि आपले वाचन कौशल्य कशा पद्धतीने वाढवावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव झिने सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाचे महत्त्व विशद केले. शनिलीलामृत या ग्रंथाचे लेखक प्रा.शिवाजीराव दरंदले यांनी शनी महात्म्य विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. बाळासाहेब खेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक राहुल निपुंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






