Home भंडारा केसलवाडा येथे शेतकऱ्यांनी शेतीशाळेत गिरवले एकात्मिक शेती पद्धतीचे धडे

केसलवाडा येथे शेतकऱ्यांनी शेतीशाळेत गिरवले एकात्मिक शेती पद्धतीचे धडे

120

आशाताई बच्छाव

1001102293.jpg

केसलवाडा येथे शेतकऱ्यांनी शेतीशाळेत गिरवले एकात्मिक शेती पद्धतीचे धडे

 

संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी

-दिनांक 27-12-2024 रोजी मौजा केसलवाडा येथे अन्न व पोषण सुरक्षा अभियान 2024-25 कडधान्य रब्बी हरभरा प्रकल्प अंतर्गत हरभरा पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये सत्राची सुरुवात इतनी शक्ती हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर होना ही प्रार्थना घेऊन करण्यात आली.त्यानंतर शेतकऱ्यांना एकात्मिक पीक व्यवस्थापन , माती परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिका यावरून खत व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हरभरा पिकावरील मररोग, मुळकुज,खोडकूज व हरभरा पिकावरील रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन बाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. ह्यावेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे व कृषी पर्यवेक्षक भूमेश नवखरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.ह्यावेळी शेतकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद व सहकार्य लाभले.

कृषीसेवक रितेश किकराळे यांनी विविध कृषि विषयक योजनांची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा विशद करून उपस्थितांचे आभार मानले व पुढील शेतीशाळा सत्राचे नियोजन करून समारोप करण्यात आला. उपस्थित शेतकऱ्यांनी सुध्दा कृषी विभागाचे आभार मानून प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

Previous articleहिंगोली येथे सम्राट प्रसेनजित विचार साहित्य संमेलन संपन्न
Next articleभंडारा जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटण स्थळ बंद ठेवण्याचे निर्देश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.