Home बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सील

146

आशाताई बच्छाव

1001100454.jpg

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सील

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि. ३० डिसेंबर २०२४ जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. संतोष देखमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. बीडमधील खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या प्रकरणात सीआयडीने वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सिल केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमधून आता सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरू केला आहे. बीड मधील खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींसाठी सीआयडीच्या नऊ पथकांकडून तपास सुरू आहे. जवळपास दीडशे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून तपास सुरू आहे. याच प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून फरार वाल्मीक कराडसह चारही आरोपींचे बँक खाते सील करण्यात आले आहेत. त्यांच्या पासपोर्ट विषयी देखील कारवाई करण्यात आली आहे. या चौघांचा राज्यासह देशभरात तपास सुरू आहे. त्यामुळे लवकरच पोलीस या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची शक्यता आहे.