Home बीड बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी बांगर यांचे अन्न पाणी त्याग उपोषण सुरू; वाल्मीक...

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी बांगर यांचे अन्न पाणी त्याग उपोषण सुरू; वाल्मीक कराड वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

154

आशाताई बच्छाव

1001100448.jpg

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी बांगर यांचे अन्न पाणी त्याग उपोषण सुरू; वाल्मीक कराड वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि.३० डिसेंबर २०२४ रोजी जिल्ह्यातील केज तालुक्यात मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या व खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यावर राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर मयुरी बांगर यांनी आज सोमवार दि. ३० डिसेंबर सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये दोन जातीमध्ये काही समाजकंटक जाणून बुजून बदनामी करण्याच्या उद्देशाने कट- कारस्थान करीत आहेत. त्यामुळे मी सौ. मयुरी विजयसिंह बांगर दि.३० डिसेंबर २०२४ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे शांततेच्या मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार संपूर्ण अन्न, पाणी त्याग अमरण उपोषण करीत आहे. याची दखल घेऊन वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.

Previous articleयुवासेनेने उचलला नगर परिषद शाळेतील पाच गरजु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार
Next articleसंतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.