आशाताई बच्छाव
युवासेनेने उचलला नगर परिषद शाळेतील पाच गरजु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- युवासेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे यांच्या नेतृत्वात सोमवार, ३० डिसेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण, फळ व ब्लँकेट वितरण कार्यक्रमासह नगर परिषद शाळेतील पाच गरजु व गरीब विद्यार्थी दत्तक घेवून त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्यात आला. हा उपक्रम युवासेनेचे कार्याध्यक्ष पुरवेश सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात राबविण्यात आला.
युवासेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे यांच्या नेतृत्वात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमामध्ये गरजुंना विविध प्रकारे मदत देण्यात येते. या कार्यात युवासैनिकही सहभागी होतात. त्यानुसार, युवासेनेचे कार्याध्यक्ष पुरवेश सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हील लाईन भागातील नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील पाच गरजु व गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेवून त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्यात आला. तसेच केकतउमरा येथील दिव्यांग कलावंत चेतन उचितकर व इतर दिव्यांग मुलांना ब्लँकेट देण्यासह आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली. याशिवाय येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना रवि भांदुर्गे व इतर पदाधिकार्यांच्या हस्ते फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण करण्यात आले. या सर्व सामाजीक कार्यक्रमाला बाळासाहेब देशमुख, वाशिम मंगरुळनाथ विधानसभा प्रमुख विजय शेळके, उपजिल्हा समन्वयक शिवम घुगे, भाग्येश राऊत, रोहीत वनजाणी, मनोज खडसे, आशु घुगे, रवि खडसे, चेतन बेलखडे, ज्ञानेश्वर गोरे, रवि खोटे, शिवम खडसे, रवि इंगोले, शंतनु भोयर यांच्यासह युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व रविभाऊ भांदुर्गे मित्र मंडळ उपस्थित होते.






