आशाताई बच्छाव
शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष प्रतिनिधी म्हणून बाजीराव देशमुख यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 29/12/2024
शेळगाव आटोळ ता.चिखली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या विशेष प्रतिनिधी म्हणून ग्रा.पं सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते बाजीराव देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य यांच्यावतीने देशमुख यांचे या निवडीनिमीत्त अभिनंदन करण्यात आले.त्यांच्या या निवडीने सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






