Home जालना पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल- आ.अर्जुनराव खोतकर

पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल- आ.अर्जुनराव खोतकर

91

आशाताई बच्छाव

1001088000.jpg

पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल- आ.अर्जुनराव खोतकर
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: शहरात होत असलेल्या पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनधाराकांची सुटका होणार असून विकासाची ही सर्व कामे आपण पूर्ण करुन घेऊत, निधीची चिंता करण्याचेही कारण नाही, असे प्रतिपादन आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना केले.÷
आ.श्री.खोतकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 67 कोटींपैकी आज बुधवारी भिमराज प्रवेश व्दार ते जयनगर चौकापर्यंतच्या 15 मिटर रुंद सिमेंट रस्ता बांधकामासाठी चार कोटी 69 लक्ष 70 हजार रुपये, राष्ट्रमाता महाविद्यालय ते रेल्वे उड्डाणपुलातपर्यंतच्या सिमेट रोडचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी 50 रुपये आणि आरपी रोड ते अग्रसेन फाऊंशेडन म्हणजेच अब्दुल हमीद चौकापर्यंतच्या (कॉलेज रोड) सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 15 लक्ष रुपयांच्या या कामांचा उद्घाटन सोहळा आ. श्री. खोतकर यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी आ. श्री. खोतकर बोलत होते.
यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, पंडीतराव भुतेकर, राजेश राऊत, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, फिरोजलाला तांबोळी, अ‍ॅड. सुनिल किनगावकर, विष्णू पाचफुले, आत्मानंद भस्त,  अ‍ॅड. भास्करराव मगरे, अमोल ठाकुर, शौळेश घुमारे, संतोषराव मोहिते, गणेशराव सुपारकर, डॉ. सुयोग कुलकर्णी, कालिंदाताई ढगे, सौ. सवितातार्स किवंडे,  उज्जलाताई फोपलिया, शेख जावेद, दिनेश भगत, दिपक वैद्य, श्रीकांत पांगारकर, कुणाल जावधव, जफर खान पठाण, योगेश रत्नपारखे, कमलेश खरे आदींची उपस्थिीती होती.
पुढे बोलतांना आ. श्री. खोतकर म्हणाले की,  आपण शहर विकासाच्या प्रश्नावर सातत्याने केंद्रित राहणार आहोत. तसेच जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Previous articleभाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Next articleछत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत जालना पोलीस फुटबॉल संघ विजयी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.