Home बुलढाणा नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याने पडले पाच टाके

नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याने पडले पाच टाके

111

आशाताई बच्छाव

1001080630.jpg

नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याने पडले पाच टाके
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा तालुका प्रतिबंधित नायलॉन मांजा अडकल्याने एक जणाचा गळा कापल्या गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी मोताळा ते मलकापूर मार्गावरील उर्दू शाळेजवळ घडली. या घटनेत जखमी जखमी अशोक झालेले अशोक झंवर यांच्या गळ्याला पाच टाके पडले आहे. दरम्यान नायलॉन मांजाची विक्री
बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये वास्तव्यास असलेले माजी सरपंच अशोक नंदलाल झंवर हे दोन दिवसांपूर्वी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने शेतात जात होते. दरम्यान, मोताळा ते मलकापूर मार्गावरील उर्दु जवाहर हायस्कूल जवळ त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने ते दुचाकीवरून खाली पडले. मांजाने त्यांचा गळा कापल्या गेल्याने रक्तस्त्राव झाला.
या वेळी नागरिकांनी त्यांना उपचारासाठी येथील खासगी
रुग्णालयात हलवले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या गळ्याला ५ टाके पडले आहे. तर मांजा गळ्यात अडकल्याने दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांना दुखापतही झाली आहे. पुढे काही दिवसांवर मकरसंक्राती सण येऊन ठेपला आहे. या वेळी अनेक पतंगबाजांकडून पंतग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लक्ष देऊन नायलॉन मांजा विक्री थांबवण्याची मागणी होत आहे.