आशाताई बच्छाव
देगलूर महाविद्यालय करियर कट्टाद्वारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास प्रारंभ.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर:-
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित, देगलूर महाविद्यालयातील करिअर कट्टाच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देन्यास सुरवात करण्यात आली आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रीडा संचालक डॉ. नीरज उपलंचवार हे होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, करियर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. माधव चोले, डॉ. सुरेश काशिदे डॉ.संजय पाटील ,डॉ. सर्जेराव रणखांब ,क्रीडा शिक्षक सिताराम हाके, क्रीडा शिक्षक मधुकर कांबळे आणि महाविद्यालयातील उत्कृष्ट खेळाडू अनिल हेमनर हेही उपस्थित होते .
सुरुवातीला करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. माधव चोले यांनी या वर्षातील करिअर कटाचा अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी करियर कट्टाच्या अधिकृत नोंदणी विद्यार्थी संख्या 200 पेक्षा जास्त असल्याची माहिती दिली.
या वर्षात आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली, तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण यासाठी 123 विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती प्रसारण केंद्र यांच्याकडे पाठवण्यात आल्याचीही माहिती दिली .
याप्रसंगी त्याने महाविद्यालयातील करियर कट्टाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कशा सोडवाव्यात, शिवाय करियर कट्टा मधील विविध उपक्रमाची माहिती दिली. त्याचा कसा फायदा घ्यावा यासंबंधीची माहिती दिली या शैक्षणिक वर्षातील सर्व अहवाल विद्यार्थ्यांसमोर सादर केला. या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ.नीरज कुमार उपलंचवार यांनी दि.26.12.24 पासून सकाळी 6 ते 8 या वेळात सुरुवात होणारे पोलीस पूर्व भरतीचे मैदानी प्रशिक्षण कसे घेण्यात येणार आहे याची माहिती दिली.
आजच्या काळातील महाराष्ट्रातील पोलिस पदासाठी मुलीं व मुलांसाठी काय निकष आहेत. याची माहिती दिली .किती वेळात मुलीने धावायचे, मुलांनी किती वेळात धावने आवश्यक आहे,
गोळा फेक मुलींनी कसा करायचा ,मुलांनी कसा करायचा यातील तांत्रिक अडचणी याची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिली. यावेळी क्रीडा शिक्षक सिताराम हाके यांनीही विद्यार्थ्यांना याची मैदानी प्रशिक्षणाची माहिती दिली .
यानंतर विद्यार्थ्यांना करिअर कट्टा च्या वतीने 123 विद्यार्थ्यांना टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. आणि शेवटी अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ सर यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्तरावरील स्पर्धा ,राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा याविषयी प्रेरणा दिली आणि करिअर कट्टाचे कसे महत्त्व वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांनी करियर कट्टामध्ये कसा सहभाग घ्यायचा आणि पुढे कसे जायचे विद्यार्थी खेडेगावातून येतात आणि विद्यार्थ्यांनी कसे या वेळेचा सदुपयोग करायचा याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा आणि आपलं आयुष्य उज्वल करावं यासाठी शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी ए ची विद्यार्थिनी स्वाती लोखंडे यांनी केले .तर कार्यक्रमाचे आभार बी ए तृतीय वर्षाचा विद्यार्थी विशाल कुडकेकर यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, माहिती प्रसारण विभाग आणि करिअर कट्टाचे महाराष्ट्राचे प्रमुख शितोळे सर किरण पाटील मॅडम अमृता मॅडम यांनी आम्हाला सहकार्य केले. शिवाय महाविद्यालयातील स्तरावर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करिअर कट्टा, समन्वयक डॉ. माधव चोले डॉ.सुरेश काशिदे यांनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.






