Home जालना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत टिंवकल स्टारचे यश

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत टिंवकल स्टारचे यश

108

आशाताई बच्छाव

1001077537.jpg

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत टिंवकल स्टारचे यश
बदनापूर, /जालना दि. २२ (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित
टिंवकल स्टार स्कूल या शाळेने मुख्यंमत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा
दोन मध्ये तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. शैक्षणिक वर्ष
२०२४-२५ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत
मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा हे अभियान सर्व माध्यमांच्या व सर्व
व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबवण्यात आले होते.
या अभियानांतर्गत शाळेचा परिसर, तेथील व्यवस्था, सुसुत्रता आदी
त्रिसूत्रीनुसार तपासणी करण्यात येते, विद्यार्थ्यांना मिळणार्‍या विविध
सोयी सुविधांची पाहणीही तज्ञांमार्फत होते. या अभियानांतर्गत बदनापूर
येथील पाथ्रीकर कॅम्पस येथील टिंवकल स्टार स्कूलने संस्थेच अध्यक्ष डॉ.
देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी व्यवस्थापन या प्रकारात
सहभाग नोंदवला होता. मुख्याध्यापिका निशीगंधा देशमुख आदी उपस्थित होते.

Previous article“जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरात एकल प्‍लास्‍टीक वापर बंदी (Single Use Plastic) बाबत कारवाई”
Next articleएनएमएमएस परीक्षा सुरळीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.