Home उतर महाराष्ट्र निर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

निर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

21
0

आशाताई बच्छाव

1001076712.jpg

निर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी -मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा साजरी करण्यात आली. या निमित्ताने भानसहिवरा येथील मंडळ अधिकारी मा. सरिता मुंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थीनींनी मोबाईल चा वापर कमी करून शिक्षणाकडे लक्ष द्यावे, आपल्या आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त महत्त्वाची आहे, आपल्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवून शिक्षण घेतले पाहिजे , सकारात्मक विचार केला तर सकारात्मक कृती होईल आणि तरच यश प्राप्त होईल, असे मत मांडले. तसेच स्त्रियांच्या अधिकारासाठी आणि सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली.
त्याचबरोबर ब्राम्हणी येथील कु. वैष्णवी ढोकणे हिने विद्यार्थिनींना कराटे प्रात्यक्षिकाह आत्मसंरक्षणाचे धडे दिले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने हे होते त्यांनी, विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर बनायचे असेल प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले.
कार्यक्रमासाठी आणि ९२ विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल निपुंगे यांनी प्रास्ताविक केले, कु. गायत्री ढोकणे हिने सूत्रसंचालन केले, डॉ संभाजी दराडे, यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रा. प्रियांका सोनवणे आणि प्रा. विशाल पवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कष्ट घेतले.

Previous articleमाझ्या प्रभूंच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून….
Next articleकेज तालुक्यातील आडस – होळ रस्त्यावर तीन महिन्याचे अर्भक सापडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here