Home बीड केज तालुक्यातील आडस – होळ रस्त्यावर तीन महिन्याचे अर्भक सापडले

केज तालुक्यातील आडस – होळ रस्त्यावर तीन महिन्याचे अर्भक सापडले

190

आशाताई बच्छाव

1001077479.jpg

केज तालुक्यातील आडस – होळ रस्त्यावर तीन महिन्याचे अर्भक सापडले

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/केज दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी केज तालुक्यातील आडस होळ दरम्यान जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका उसाच्या शेतात तीन महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ०७:०० वाजण्याच्या सुमारास शेतात जात असलेल्या एका शेतकऱ्याला उसाच्या पाचटाच्या शेतात कळ्या व लाल रंगाच्या चौकटी रघ पांघरून घातलेले एक तीन महिने वयाचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. शेतकऱ्याने ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली. माहिती मिळतात पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल शेंडगे आणि पोलीस खेडकर व महिला पोलीस गाडेकर यांना घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी रवाना झालेल्या पोलिसांनी सदर अर्भक ताब्यात घेऊन त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले आहे. सदर अर्भक हे कोणाचे आहे त्याची माता कोण आहे व त्याला या अवस्थेत कोणत्या कारणामुळे टाकून गेली याचा शोध घेणे गरजेचे आहे, तरी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous articleनिर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
Next articleसरकार झोपलं का ? पंधरा दिवस उलटले तरी संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी मोकाट कसे ?जनतेचा आक्रोश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.