आशाताई बच्छाव
माहोरा येथे आ.संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन संपन्न.
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 20/12/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार श्री संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त माहोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळा येथे दिनांक 19 डिसेंबर रोज गुरुवारी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कीर्तनाची सुरुवात 8:00 वाजता झाली. कीर्तनाच्या सुरवातीला काही अभंग आणि हरिपाठ घेऊन झाली . त्यानंतर ह.भ.प.इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधन पर किर्तनाला सुरुवात केली.त्यामध्ये त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन केले.शिक्षण देणं केवळ शिक्षकांचीच जबाबदारी नसून पालकांनी सुद्धा आपल्या पाण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आपल्या विनोदी शैलीतून इंदोरीकर महाराज यांनी अनेक सामाजिक उनिवा कडे उपस्थित श्रोत्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. नवतरुणांनी व्यसनापासून व वाईट विचार व गुन्हेगारी पासून दूर रहाण्याचा सल्ला दिला.व्यसनाधिनतेमुळे अपघात, आत्महत्या यांचे प्रमाण खूप वाढले आहे. आपल्याच आई-वडिलांसमोर लहान मुलांसमोर व्यसनाधीन लोकांचे प्रेत जातात याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या आई वडीलांची सेवा करा.त्यांचे नाव कसे मोठे होईल अशी कामे करावी.आई वडिलांची मान खाली घालावी लागु नये असे तरूण मुलं आणि मुलींना विनोदी वाणीतून सांगितले.
कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे,निर्मलाताई दानवे, देविदास पाटील जाधव धाड तसेच माहोरा पंचक्रोशीतील पदाधिकारी व नागरिक तसेच महिला वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होता .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजेश म्हस्के अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जाफराबाद तसेच ह.भ.प.श्री.संतोष आढावणे पाटील महाराज यांनी खूप मोठे परिश्रम घेतल्याचे पहावयास मिळाले.






