Home जालना जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला निसर्ग सहलीचा आनंद

जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला निसर्ग सहलीचा आनंद

102

आशाताई बच्छाव

1001066928.jpg

जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला निसर्ग सहलीचा आनंद
———————————————–
इनरव्हील क्लब ऑफ जालना मेन द्वारा विद्यार्थ्यांना स्वादिष्ट अल्पोहाराचे वितरण
———————————————
कोठारी इंटरनॅशनल ड्रीम इंग्लिश स्कूलचे संचालक विनयकुमार कोठारी यांनी सहलीसाठी स्कूल बस उपलब्ध करून दिल्या
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 20/12/2024
जनता हायस्कूल जालना येथील शालेय विद्यार्थ्यांची निसर्गसहल आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता नाव्हा रोड येथील वन विभागात काढण्यात आली होती सदरील सहलीमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शालेय विद्यार्थ्यांना शाळेपासून वन विभागात घेऊन जाणे व घेऊन येणे यासाठी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम इंग्लिश स्कूलचे संचालक विनयकुमार कोठारी यांनी विनामूल्य स्कूल बस उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांनी बिन भिंतीच्या उघड्या शाळेत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला यावेळी विद्यार्थ्यांनी अंताक्षरी, कविता गायन,डोके लढवा कोडी सोडवा यासह विविध खेळ याचा मनमुराद आनंद लुटला. निसर्ग सहलीत इनरव्हील क्लब ऑफ जालना मेनच्या अध्यक्षा सौ. मधुलता भक्कड, सचिव सौ. सुनिता मालपानी, सदस्या सौ. अपर्णा बागडी यांनी उपस्थित राहून विद्यार्थांशी संवाद साधून गरम समोसे व जिलेबी या स्वादिष्ट अल्पोपहाराचे वितरण केले.
यावेळी विद्यार्थ्यांना सदरील परिसरातील प्राणी, पक्षी व नैसर्गिक पाणवठे याची माहिती वनसेवक बी.डी. भाटसोडे यांनी करून दिली. सदरील परिसरातील शांततेत मुलांनी परिसरात मनसोक्त भटकंती चा आनंद घेऊन शेवटी सामूहिक वनभोजनाचा सर्वांनी आनंद लुटला सदरील सहलीच्या आयोजनासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी. नागरगोजे, वनरक्षक बी.व्ही. घुगे, वनपाल एन.ई.राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले
सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार, पवन जोशी, संतोष गंडाळ ,प्रभाकर सावंत ,बाबासाहेब पवार ,सुधीर वाघमारे ,संदीप तोडावत यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमाहोरा येथे आ.संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन संपन्न.
Next articleइंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक शालेय स्तरावरील प्रदर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.